मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना Chief Minister’s Tirtha Darshan Yojana

महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत, जनतेला प्रमुख तीर्थस्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. सदर योजनें अंतर्गत निर्धारित स्थळा पैकी एका स्थळाच्या यात्रे करिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रु. ३०,०००/- इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास , भोजन,निवास इ.सर्व बाबींचा समावेश असेल. राज्यातील तसेच परराज्यातील चारधाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा तीर्थस्थळांनाही भेट देता येईल. या योजनेचे नुकतेच शासकीय परिपत्रक काढण्यात आले असून, यात योजनेच्या अटी, शर्ती, नियम, वय आदींची माहिती देण्यात आली आहे.
योजनेचे लाभार्थी आणि पात्रता :-
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा राहवाशी असणे आवश्यक .
- लाभार्थीचे वय ६०वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक .
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
लाभ मिळण्याकरिता कागदपत्रे :-
- ऑनलाईन अर्ज करता येईल .
- आधार / रेशनकार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/ महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
- अधिवास प्रमाणपत्र नसेल तर मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र,किंवा पिवळे रेशनकार्डही ग्राह्य धरले जाईल.
- वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक,
या सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
योजनेची अपात्रता पध्दत :-
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे
- कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता आहे.
- ज्या कुटुंबातील व्यक्ती नियमित /कायम कर्मचारी सरकारी विभाग /उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्था मध्ये कार्यरत आहेत , निवृत्ती वेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- शासनाच्या इतर विभागामार्फतराबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल
- कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड /कॉपोरेशन/ बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्यांच्याकडे ( ट्रॅक्टर सोडून ) घरात चार चाकी सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तरही ती लाभार्थी अपात्र समजली जाईल.
- सदर योजनेच्या “पात्रता”व “अपात्रता”निकषा मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
लाभार्थ्यांची निवड , प्रवास प्रक्रिया ,अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच इतर माहिती साठी
सदर GR पाहावा