“Bigg Boss Marathi Season 5 मधील १६ स्पर्धकांची यादी पहा आणि त्यांच्या संपूर्ण माहिती जाणून घ्या. या सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी झाले आहेत.
प्रेक्षकांच्या भेटीला नव्या रुपात, नव्या ढंगात बिग बॉस मराठी ५ सीझन २८ जुलै रोजी पाचव्या सीझनचा प्रीमियर पार पडला. या बिग बॉस मराठी ५ सीझनचा होस्ट म्हणून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आहेत.
bigg boss marathi season 5 बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये 16 नवीन स्पर्धकांसह पुनरागमन झाले आहे. तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 5 कलर्स मराठीवर रात्री 9 वाजता पाहू शकता आणि ते JioCinema वर स्ट्रीम करू शकता.
वर्षा उसगांवकर ( फोटो सौजन्य-Instagram )
Varsha Usgaonkar ह्या एक दिग्गज मराठी – हिंदी ,नाटक,चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री त्यांची अनेक दशकांची शानदार कारकीर्द आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टेलिव्हिजन या दोन्ही क्षेत्रांत ती एक प्रमुख व्यक्ती आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये माई ही भूमिका साकारली होती . त्यांचे अनेक चित्रपट गाजले या मध्ये गंमत जंमत, सगळीकडे बोंबाबोंब, सवत माझी लाडकी, हमाल दे धमाल ,खट्याळ सासू नाठाळ सून, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस , एक होता विदूषक, आत्मविश्वास, आमच्या सारखे आम्हीच,जमलं हो जमलं, भुताचा भाऊ, बाप रे बाप ,पैज लग्नाची ,शुभमंगल सावधान, लपंडाव आणि हिंदी मध्ये दूध का कर्ज , तिरंगा,हफ्ता बंद असे अनेक चित्रपट केले आहेत .
निखिल दामले ( फोटो सौजन्य-Instagram )
Nikhil Damle यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीपासून केली निखिल त्यानंतर रामा राघव आणि हृदयात वाजे समथिंग , Almost सुफळ संपूर्ण उल्लेखनीय हिंदी – मराठी नाटक आणि मालिका मध्ये दिसले आहेत.
अंकिता प्रभू वालावलकर ( फोटो सौजन्य-Instagram ) – Ankita Prabhu Valawalkar
अंकिता वालावलकर एक कंटेंट क्रिएटर बिझनेस वुमन आणि व्लॉगर आहे. अंकिता वालावलकरचे तिच्या Kokanheartedgirl या इंस्टाग्राम अकाउंटवर 500K+ फॉलोअर्स आहेत. कोंकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली, अंकिता प्रभू वालावलकर ही एक सोशल मीडिया प्रभावशाली आहे जी तिच्या engaging and creative content साठी ओळखली जाते. तिच्या अनोख्या आणि युनिक पोस्ट्समुळे तिला प्रचंड फॉलोअर्स मिळाले आहेत.
पंढरीनाथ कांबळे ( फोटो सौजन्य-Instagram )
Pandharinath Kamble उर्फ पॅडी कांबळे हे भारतीय मराठी चित्रपट आणि दूरदर्शन एक मराठी विनोदी अभिनेते आहेत. ‘पॅडी’ म्हणून लोकप्रिय आहेत. प्रमुख नाटक कुमारी गंगूबाई नॉन मॕट्रिक – मराठी चित्रपट दम डम डिगा , मुन्नाभाई एसएससी, नो एंट्री पुढे धोका आहे , येड्यांची जत्रा यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत . प्रमुख टीव्ही कार्यक्रम हसा चकट फू कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्य जत्रा
योगिता चव्हाण – ( फोटो सौजन्य-Instagram )
Yogita Chavan जीव माझा गुंतला कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला मालिकेतून घराघरात पोहोचली . राडा या सिनेमात देखील झळकली होती. अभिनेत्री योगिता चव्हाण सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे.
जान्हवी किल्लेकर ( फोटो सौजन्य-Instagram )
Janhvi Killekar प्रतिभावान मराठी अभिनेत्री मराठी टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. त्यांनी मराठी “ भाग्य दिले तू मला ” या मालिके मधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. “राधा प्रेम रंगी रंगली”, “दिल दोस्ती दुनियादारी” आणि “हृता दुर्गुलेचे फुलपाखरू” सारख्या इतर लोकप्रिय मराठी टीव्ही शोमध्ये देखील काम केले आहे. प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना देखील आहे.
अभिजीत सावंत ( फोटो सौजन्य-Instagram )
Abhijeet Sawant इंडियन आयडॉलचे पहिले विजेते अभिजीत सावंत यांनी भारतीय संगीत उद्योगावर कायमचा प्रभाव पाडला आहे. “जुनून,” “मोहब्बतें लुटौंगा,” आणि इतर अनेक हिट गाण्यांसह, त्याने स्वतःला एक यशस्वी पार्श्वगायक आणि कलाकार म्हणून स्थापित केले आहे. अभिजीतचा संगीतमय प्रवास आणि यशामुळे त्याला एक समर्पित चाहता वर्ग मिळाला आहे
घनश्याम दराडे ( फोटो सौजन्य-Instagram ) –
Ghanshyam Darade 10 वर्षांपूर्वी लोकप्रियता मिळवली होती जेव्हा त्याची राजकीय नेत्यासारखी बोलण्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावेळी त्याची क्षमता पाहून लोक त्याना छोटा पुढारी (छोटा नेता) म्हणून म्हणून संबोधू लागले. घनश्याम दराडे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या टाकळी लोणार या गावचा रहिवासी आहे. व्हायरल क्लिपमध्ये घनश्याम अनेक प्रमुख लोकांना लक्ष्य केले होते.
इरिना रूडाकोवा ( फोटो सौजन्य-Instagram )
Irina Rudakova ही “बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झालेली विदेशी स्पर्धक आहे. ती मूळची रशियाची असून, मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इरिनाने भारतीय प्रीमियर लीग (IPL) मध्ये चीअरलीडर म्हणून काम केले आहे. तसेच, तिने “छोटी सरदारनी” या टीव्ही शोमध्येही काम केले आहे.
निक्की तांबोळी – ( फोटो सौजन्य-Instagram )
Nikki Tamboli ही एक सुप्रसिद्ध टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आणि अभिनेत्री आहे जिने बिग बॉस हिंदीमध्ये सहभाग घेतल्यानंतर व्यापक ओळख मिळवली. तिच्या मजबूत आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाने तिला एक उत्कृष्ट स्पर्धक बनवले आणि पुढे तिने खतरों के खिलाडीमध्ये तिची धाडसी बाजू दाखवली. निक्कीने हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही चित्रपटांमध्येही काम केले आहे. तमिळ मध्ये अॅक्शन हॉरर चित्रपट कांचना 3 काम केले आहे .
वैभव चव्हाण ( फोटो सौजन्य-Instagram )
Vaibhav Chavan हा मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे ज्याच्या नावावर अनेक यशस्वी टीव्ही शो आहेत. त्याच्या अभिनयातील विविधता आणि अष्टपैलुत्वासाठी त्याची प्रशंसा केली जाते, विविध भूमिका आणि शैलींमध्ये सहजतेने संक्रमण होते. वैभवची प्रतिभा आणि समर्पण यामुळे त्याला एक मजबूत चाहता वर्ग मिळाला आहे
अरबाज पटेल – ( फोटो सौजन्य-Instagram )
Arbaj Patel SplitsVilla चा स्टार अरबाज पटेल अरबाज पटेल मराठी मनोरंजन विश्वात एक नाव आहे. विशेषत: SplitsVilla या युवा कार्यक्रमातून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांचा आकर्षक व्यक्तित्व आणि खेळाडू वृत्तीमुळे ते तरुणांच्या प्रेरणास्थान बनले आहेत. SplitsVilla च्या १५ व्या सिझनमध्ये अरबाजने आपल्या उत्साही स्वभावाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या खेळाच्या धाटणी आणि इतर स्पर्धकांशीच्या नातेसंबंधांमुळे ते या सिझनमध्ये चर्चेत राहिले.
आर्या जाधव ( फोटो सौजन्य-Instagram )
Arya Jadhav अमरावती येथील एक गुणी रॅपर, एमटीव्ही वाहिनीवरील ‘हसल-२’ या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या अनोख्या शैलीने आणि प्रभावी परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांच्या मनात घर करू शकली आहे. आर्याने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि नंतर रॅप संगीताच्या क्षेत्रात आपले पाऊल ठेवले. ‘हसल-२’ कार्यक्रमात तिच्या दमदार परफॉर्मन्सने तिला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. तिच्या रॅपमध्ये ती सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकते आणि ती आपल्या गाण्यांमधून स्पष्टपणे बोलते.
पुरुषोत्तमदादा पाटील ( फोटो सौजन्य-Instagram )
Purushottamdada Patil सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. पुणे, मुंबई, ठाणे,आळंदी येतील मठाधीपती आहेत. कीर्तनामध्ये एक खास स्थान असलेले व्यक्तिमत्त्व आहेत आणि त्यांच्या कीर्तनशैलीमुळे त्यांनी लोकांमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.
धनंजय पवार DP – ( फोटो सौजन्य-Instagram )
Dhananjay Powar DP धनंजय पवार एक कंटेंट क्रिएटर आहे त्याच्या सोशल मीडियाद्वारे अनेक चाहत्यांना आकर्षित केले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर इचलकरंजी मधील प्रसिद्ध उद्योजक ते सोशल मीडिया मधील रीलस्टार पर्यंत त्यांचा प्रवास अतिशय लोकप्रिय आहे . कॉमेडीचा जादूगार धनंजय पोवार उर्फ सर्वांचे लाडके “डी पी” या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घरातील आणि त्यांच्या मित्राबरोबर अनेक विषयावर व्हिडिओ बनवत असतात. कोल्हापुरी रांगडी भाषे मुळे ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रबाहेर हि फेमस आहेत. त्यांनी चला हवा येउ द्या कार्यक्रमातही मंच गाजवला आहे. त्यांना क्रिकेट खेळण्याची देखील खूप आवड आहे.
सूरज चव्हाण ( फोटो सौजन्य-Instagram )
Suraj Chavan एक सोशल मीडिया स्टार आणि रील क्रिएटर आहेत. ‘गुलीगत धोका’ या लोकप्रिय व्हिडिओमुळे त्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि उत्साही परफॉर्मन्समुळे ते अनेकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.सूरजची करिअरची सुरुवात टिकटॉकवर व्हिडिओ बनवून झाली. त्यांच्या व्हिडिओंनी व्हायरल होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून दिली. टिकटॉक भारतात बंद झाल्यानंतर, सूरजने यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपला करिअर सुरू ठेवला. त्यांनी “प्रेमासाठी काहीपण” या यूट्यूब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळवली आणि “बुक्कीत टेंगुळ” हे व्हिडिओ देखील तयार केले.