‘खेल खेल में’: अक्षय कुमारचा नवीन थ्रिलर चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित

बॉलीवूडचा एक्शन हिरो अक्षय कुमार आपल्या नव्या चित्रपट ‘खेल खेल में’ सह पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा  चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

खेल खेल में’ ‘खेल खेल में’: अक्षय कुमारचा नवीन थ्रिलर चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक रोमांचक थ्रिलर आहे जो प्रेक्षकांना त्यांच्या सीटवर  खेळवत  ठेवेल. या चित्रपटात अक्षय कुमार एका अनपेक्षित भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत तापसी पन्नू, वाणी कपूर, एमी विर्क, आदित्य सील, प्रज्ञा जैस्वाल आणि फरदीन खान सारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मुदस्सर अझीझ यांनी केले आहे. मुदस्सर अझीझ यांनी यापूर्वी अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि त्यांच्या अनोख्या कथाकथन शैलीमुळे ‘खेल खेल में’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.

कलाकार –

* अक्षय कुमार

* तापसी पन्नू

* वाणी कपूर

* एमी विर्क

* आदित्य सील

* प्रज्ञा जैस्वाल

* फरदीन खान

दिग्दर्शन:

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मुदस्सर अझीझ यांनी केले आहे. मुदस्सर अझीझ यांनी यापूर्वी अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि त्यांच्या अनोख्या कथाकथन शैलीमुळे ‘खेल खेल में’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.

कथानक

‘खेल खेल में’ हा चित्रपट नक्कीच बॉलीवूड प्रेक्षकांना एक अप्रतिम मनोरंजनाचा अनुभव देईल. ७ मित्र एका रात्रीच्या जेवणासाठी एकत्र येतात. मजा वाढवण्यासाठी ते एक खेळ खेळण्याचा निर्णय घेतात. या खेळाच्या नियमानुसार, त्यांना फोनवर येणारा प्रत्येक कॉल, मेसेज आणि इमेल सर्वांसमोर वाचून दाखवायचा असतो. सुरुवातीला हा खेळ मजेदार वाटतो पुढे एकमेकांविषयीचे रहस्ये उलगडत जाते यातुन पुढे काय होते ते चित्रपट गृहात पाहणे योग्य ….. 

हा चित्रपट विश्वास, संशय, आणि नातेसंबंध या संकल्पनांवर आधारित आहे. हा चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपण आपल्या जोडीदारांवर किती विश्वास ठेवतो आणि आपल्या फोनवर काय आहे ते आपण त्यांच्याशी शेअर करण्यास तयार आहोत का?

Leave a Comment