बिग बॉस मराठी’ सीझन 5 – अरबाज पटेलचे धक्कादायक एलिमिनेशन

बिग बॉस मराठी’ सीझन 5 चा हा आठवडा खूपच नाट्यमय ठरला अरबाज पटेलचे धक्कादायक एलिमिनेशन

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये नुकतंच धक्कादायक एलिमिनेशन पाहायला मिळालं, ज्यामध्ये आठव्या आठवड्यात अरबाज पटेलला घरातून एक्झिट घ्यावी लागली. या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेत ‘जंगलराज’ ही थीम ठेवण्यात आली होती.

काय होती ‘जंगलराज’ थीम?

या आठवड्यात ‘जंगलराज’ थीम अंतर्गत नॉमिनेशन कार्य पार पडलं होतं. यात अरबाजसह जान्हवी, वर्षा, निक्की, आणि सूरज या पाच सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं. हे सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी आपापल्या जागी उभे होते. पण नॉमिनेशन कार्यानंतर सर्वात कमी व्होट्स अरबाज पटेलला मिळाले. त्यामुळे त्याला शोमधून बाहेर पडावं लागलं.

निक्कीचे भावनिक क्षण

अरबाज पटेलच्या एलिमिनेशननंतर निक्की भावनिक झाली. अरबाजचा प्रवास संपल्यानंतर निक्की ढसाढसा रडू लागली.

Leave a Comment