राज्यातील युवक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असतात, मात्र अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, विशेषतः 12वी पास, ITI, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर युवकांमध्ये राज्यात उपलब्ध रोजगार संधी असूनही योग्य मार्गदर्शन आणि अनुभवाचा अभाव यामुळे युवकांना पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होते.या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” 2024-25 आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली. या योजनेचा उद्देश राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि बेरोजगारी कमी करणे हा आहे. योजनेद्वारे युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता (Employability) वाढेल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?
राज्यातील युवक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असतात, मात्र अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” 2024-25 आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे.
योजनेचे उद्दिष्ट
- रोजगार संधी वाढवणे: 12वी पास, ITI, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे.
- युवकांना रोजगारक्षम बनवणे: रोजगारक्षम बनवण्यासाठी युवकांना आवश्यक कौशल्ये आणि प्रशिक्षण देणे.
- बेरोजगारी कमी करणे: राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची वैशिष्ट्ये
प्रशिक्षण आणि रोजगार
बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी, आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, आणि शोध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी या https://www.rojgar.mahaswayam.gov.in/ संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवता येईल.
सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल आणि या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत शिष्यवृत्ती स्वरूपात मानधन दिले जाईल. हे मानधन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाईल, ज्यामुळे त्यांची कौशल्ये वाढतील आणि त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल.
संकेतस्थळाद्वारे नोंदणी
रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार देणारे उद्योजक या योजनेच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य संकेतस्थळावर नोंदणी करू शकतील. उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन त्यांची कौशल्ये वाढवली जातील, तर उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. ज्यामुळे दोघांनाही एकमेकांशी जोडले जाईल.
रोजगार इच्छुक उमेदवार -पात्रता निकष
- वय: 18 ते 35 वर्षे.
- शैक्षणिक पात्रता: 12वी पास, ITI, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण.
- रहिवास: उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- आधार नोंदणी: आधार क्रमांक नोंदणीकृत असावा.
- बँक खाते: आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
- नोंदणी क्रमांक: कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे.
आर्थिक लाभ
- 12वी पास उमेदवारांना: रु. 6,000/- प्रतिमाह
- ITI/ पदविका धारकांना: रु. 8,000/- प्रतिमाह
- पदवीधर/ पदव्युत्तर उमेदवारांना: रु. 10,000/- प्रतिमाह
अधिक माहितीसाठी https://www.rojgar.mahaswayam.gov.in/ संकेतस्थळावर भेट द्या