महाराष्ट्र राज्य सरकार ने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना " घोषित केलेली आहे. या योजनेतुन पात्र महिलांना रुपये १५००/- प्रत्येक महिन्याला त्याच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य मिळणार आहेत.सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे . Majhi Ladki Bahin Yojana in Marathi
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्ती
Chief Minister Majhi Ladaki Bahin Yojana Document
- ज्या पात्र महिला आहेत. त्यांना अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल
- महाराष्ट्र राज्यातील वय वर्षे २१ ते ६५ या वयोगटातील राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
- सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र जर आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर १५ वर्ष वर्षपूर्वीचा जन्म दाखला ,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ,रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र या पैकी कोणतेही एक ग्राहय धरण्यात येणार आहेत.
- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
- कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न रू २.५० लाखापेक्षा जास्त नसावे
- रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे
- बँक खाते पासबुक झेरॉक्स प्रत.
- फोटो.
- रेशन कार्ड
- सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”योजनेची कार्य पध्दत :-
- अर्ज करण्याची प्रक्रिया – योजनेचे अर्ज पोर्टल /मोबाइल ॲपद्वारे/सेतू केंद्राव्दारे ऑनलाईन भरला जाईल
- अर्ज ची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्ये असेल .
- ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज ” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी/ग्रामीण आदिवासी )/ग्रामपंचायत/ वॉर्ड /सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन भरला जाईल
- पात्र महिला सादर ठिकाणी फोटो आणि E-KYC करता येईल या साठी उपस्थित राहणे आवश्यक
- सोबत कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड) स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक majhi ladki bahin yojana in marathi
योजनेची अपात्रता पध्दत :-
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे
- कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता आहे.
- ज्या कुटुंबातील व्यक्ती नियमित /कायम कर्मचारी /कंत्राटी कर्मचारी सरकारी विभाग /उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्था मध्ये कार्यरत आहेत , निवृत्ती वेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- शासनाच्या इतर विभागामार्फतराबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल
- कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड /कॉपोरेशन/ बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्यांच्याकडे ( ट्रॅक्टर सोडून ) घरात चार चाकी सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तरही ती लाभार्थी अपात्र समजली जाईल.
- सदर योजनेच्या “पात्रता”व “अपात्रता”निकषा मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कालमर्यादा – अर्ज सुरुवात दि. १ जुलै २०२४ पासून
अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दि. ३१ऑगस्ट २०२४ पर्यंत
Proudly powered by WordPress