महाराष्ट्र राज्यातील राज्यातील विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना २०२४-२५ करिता महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या योजनेस २०२४-२५ करिता एकूण 75 विद्यार्थ्यांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जून २०२४ पर्यंत देण्यात आली होती. या योजनेस मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आणखी १५ दिवसांची म्हणजे १५ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पुणे इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालकांनी दिली आहे.
शिष्यवृत्ती योजनेचे नाव
परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश :-
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.)विशेष अध्ययन करण्यासाठी मदत देणे.
योजनेच्या अटी व शर्ती
विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे
विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत QS (Quacquarelli Symodes) Ranking २०० च्या आतील असावी.
एकूण जागेपैकी ३०% जागा मुलींसाठी राखीव
वयोमर्यादा –
पदव्युत्तर पदविका / पदवी परदेशी शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांचे वय ०१ जून २०२४ रोजी 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे .
पीएचडीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमाल वयोमर्यादा ४० वर्षापर्यंत असेल
शैक्षणिक अहर्ता
- परदेशातील पदव्युत्तर पदवी / किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५% गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी .
- पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५% गुणांसहित पदव्युत्तर पदवी / किंवा पदव्युत्तर पदविका परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी .
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनेअर्जाच्या दिनांकाला पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा .
परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहितीसाठी विभागाच्या अधीकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना 2024-25 https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/mr/sana-2024-25-yaa-saaikasanaika-varasaakaraitaa-vaijaabhaja-imaava-va-vaimaapara-paravaragaataila
वरील संकेतस्थळा (वेबसाईट) वरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे १ यांच्याकडे पात्र विद्यार्थ्यांनी ( मुदतवाढ दिनांक ) १५ जुलै २०२४ रोजी सायं. ६.१५ वाजेपर्यंत जमा करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक यांनी केले आहे.
निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्ती या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार व शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक ३०-१०-२०२३ व शासन निर्णय नियोजन विभाग दिनांक २०-०७-२०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील.
योजनेच्या अर्जाचा नमुना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर आहे. पात्र विद्यार्थ्यांनी योजनेचा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे १५ जुलै २०२४रोजी सायं.६.१५ वाजेपर्यंत करायचाआहे.
परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2024-25